रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू

0
298

मूल : – चंद्रपूर रेल्वे मार्गावरील मूल स्टेशन पासून १ कि.मी.अंतरावर नर चितळाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाल्याची घटना १४ डिसेंबर २०२२ बुधवार रोज उघडकीस आली.

सदर घटनांची माहिती  मॉर्निंग वॉकला  जाणाऱ्या नागरीकांनी वन विभागाला व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिली.


माहिती मिळताच उमेशसिंह झिरे,  क्षेत्र सहाय्यक मस्के, प्रशांत मुत्यारपवार, वनमजूर विशाल टेकाम, आशीष बोरकर हे घटनास्थळी जाऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कु.प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात पंचनामा केला व तसेच पशूवैद्यकीय अधिकारी संदिप छौंकर यांनी चितळाचे शवविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here