वाघाचा हल्ल्यात गुराखी ठार : वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

0
382

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
मुल तालुक्यातील कांतापेठ येथे शेळ्या चरावयास गेले असलेल्या गुराखीवर अचानक वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना  दि. 14 डिसेंबर 2022 रोजी सांयकळी 5.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.


सदर घटनेत मृतकाचे नाव देवराव लाहणू सोपनकर  वय (54) वर्ष असे असून तो नेहमीप्रमाणे जंगलात शेळ्या चरावयास गेले असतात सायंकाळी घरी परत न आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात शोध घेतल्यास गावापासून अंदाजे 4 कि.मी. अंतरावर असलेल्या चिरोली नियतक्षेत्र क्र. 720 मध्ये रक्ताने भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेहाची पाहणी केली असता लक्षात आले की वाघाने हल्ला करून दीड कि.मी. लांब अंतरावर  फडखळत नेऊन ठार केले आहे.
मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळतात चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार दोन महिल्यापूवी देखील याच परिसरात शेतात काम करत असणाऱ्या महिलेवर  वाघाने हल्ला करून ठार केले होते. सदर परिसरात वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे. वनविभागाने  वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here