वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांचे दुःखद निधन

0
359

चंद्रपूर : वनविभाग गडचिरोलीत बरेच वर्ष क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले नैताम यांचे दुःखद निधन झाले. त्यांनी गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात क्षेत्र सहाय्यक म्हणून बरेच वर्ष कार्य केले होते. त्यानंतर पदोन्नती घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर येथे गस्त पथकात कार्यरत होते.

परंतु मागील काही दिवसापासून त्यांच्या प्रकृती मध्ये अचानक बिघाड झाले असल्याने त्यांचे उपचार सुरू होते. मात्र बरेच दिवसापासून त्यांच्या प्रकृती मध्ये बदल न झाले असल्यामुळे त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे नेत असतांना रस्त्यातच निधन झाले.

नैताम यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाची डोंगर कोसळले आहे. वनविभाग चिमूर मध्ये देखील दुःख व्यक्त केले व त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना देखील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here