चंद्रपूर महाऔद्योगिक केंद्रात काम करणाऱ्या  कंत्राटी कामगाराला वाघाने केले ठार

0
965

चंद्रपूर :

मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर CTPS परिसरातील वाघांचा वावर असल्याचे दिसून येत आहे तसेच बरेच सामाजिक कार्यकर्ता व वन्यजीव प्रेमी यांनी वाघाचा बंदोबस्त  करण्या बाबत शासनाकडे निवेदन केले  तरी सुद्धा यावर काहीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे .
त्याचेच परिणाम  काल रात्री दिनांक 16 फरवरी 2022 बुधवार रोज चंद्रपूर औद्योगिक वीज निर्मिती केंद्रात काम करणारा कंत्राटी कामगार कामावरून परत घराकडे जात असताना त्याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
मृतकाचे नाव भोजराज मेश्राम वय 59 वर्षे असून राहणार वैद्य नगर तुकुम येथील रहिवासी होता.

भोजराज CTPS मध्ये एका कुणाल कंपनी मध्ये कंत्राटी पद्धतीवर युनिट क्र. 8 व 9 मधील बेल्टचा काम करीत होता. नेहमी प्रमाणे आपले काम खतम करून रात्री घरी परत जात असताना पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करुन ठार केले.
तपास दरम्यान आज दि.17 फरवरी 2022 रोजी  सकाळच्या सुमारास शव प्राप्त झाले.
सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त लवरात लवकर करण्याची मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here