
यश कायरकर:
ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगांव उपक्षेञातील पेन्ढरी कोके बिटामधील दिवान तलाव परीसरात वाघाने हल्ला करून केल्याची घटना उघड़किस आली. जंगल परिसरात तेंदुपत्ता गोळा करण्यास गेली असता असलेल्या सिताबाई गुलाब चौके राहणार पेन्ढरी कोके हिला वाघाने हल्ला करून जागीच ठार मारले. हि घटना आज दि 19 मई 2021 रोजी सकाळी ८ वाजता च्या सुमारास घडली. वन विभागाला माहिती होताच घटना स्थळी पोहचुन पंचनामा केला व पुढील तपास शुरू आहे.
