अंबरग्रीस जप्त करण्यास नागपूर वन विभागाला यश

0
729

नागपूर : नागपूर वनविभागाच्या पथकाने दि.१७ जून २०२२ रोजी अंबरग्रीस तस्करी करतांना चार इसमास जप्त करण्यास मिळाले यश. त्याच्या कडून व्हेल व्होमीट किंवा ग्रेअंबर जप्त करण्यात आले.

अंबरग्रीसचा वापर मोठ्या प्रमाणावर परफ्युम, सौदर्य उत्पादने आणि काही औषधे बनविण्यासाठी केला जातो व त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. स्पर्म व्हेलच्या बॉयलर पासून तयार केलेल्या अंबर ग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्झरी परफ्युममध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रचंड किमतीमुळे “प्लॉटिंग गोल्ड” म्हटले जाते.


मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून नागपुरातील एका सक्रिय टोळी अंबरग्रीसच्या व्यापारी ताब्यात घेण्यात आले.
यात अरुण गुंजर, पवन गजघाटे, राहुल दुपारे आणि प्रफुल मतलाने हे सर्व नागपूर येथील रहिवासी असून यांच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण)  अधिनियम १९२७ च्या विविध कलमाखाली गुन्हा क्र.१२५ ४५४ दि.१७ जून २०२२ नोंदविण्यात आले.
सदरचे कारवाही  मुख्य वनसंरक्षक (प्रा) रंगनाथ नाईकडे भावसे, मुख्य वनसंरक्षक (प्रा), नागपूर वनवृत्त नागपूर, डॉ. भगतसिंह हाडा भावसे, उपवनसंरक्षक (प्रा), नागपूर वनविभाग सहाय्यक वनसंरक्षक, उमरेड नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनात डी.पी. वाडे, बुटीबोरी कु. सारिका वैरागडे, सेमीनरी हिल्स वनपरिक्षेत्र अधिकारी कुरेशी क्षेत्र सहाय्यक निलेश टवले, कुलरकर, गणेश जाधव, पडवळ, विनोद शेंडे, ताडाम, महादेव मुंडे, मारोती मुंडे सर्व वनरक्षक यांनी सापळा यशस्वी करण्यास मदत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here