जनकापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

0
307

तळोधी (बा.) : नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे दि. १८ जुलै २०२२ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास दोन शेतकऱ्याच्या तीन शेळ्या गोठ्यात येऊन बिबट्याने ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने गावात दहशत पसरली असून, संबंधित बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थ करित आहेत.

सध्या ग्रामिण भागात सर्वत्र धान रोवनीचे काम सुरू आहे. जनकापूर हे गाव जगंल व्याप्त असून घोडाझरी अभंण्यालगत अड्याळमेंढा जंगल परिसर लागुन आहे.   त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्याचा वावर नेहमीच असतो. त्यामुळे या परिसरात बिबट्या चे  हमल्यात पाळिव प्राणी मारले जाण्याची घटना घडतच असतात. आज पर्यत अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्याला बिबट्याने ठार केले आहे.
यातच पुन्हा एक घटना बिबट्या ने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या एकनाथ खोब्रागडे, व वंदेश खोब्रागडे यांच्या मालकीचे तीन शेळ्या अंदाजे (50,000/-) पन्नास हजार रुपये  किमंतीच्या शेळ्या ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती वनरक्षक नवघडे यांना देण्यात आली असता मौका पंचनामा करून मृत्तक शेळ्याना जमिनित पुरण्यात आले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी व मानव जीवावर हल्ला करण्या पुर्वी सदर बिबट्या चे बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तंटामुक्त समितिचे अध्यक्ष अशोक बोरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल रामटेके, माजी उप सरपंच सचिन मसराम, वन हक्क समिती अध्यक्ष प्रा.अरविंद चंदनखेडे तथा ग्रामस्थांनी वनविभागाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here