लॉकडाऊन संपल्यावर पावले जंगलाकडे वळतील….!

0
408

सर्व गाईड बंधु व भगिनींना सप्रेम नमस्कार….

सद्या आपण करोनामुळेच आपण सर्वच अडचणीत सापडलो आहे, पण हे पण दिवस जातील. ज्या प्रमाणे रात्री नंतर सोनेरी सकाळ होते त्याच प्रमाणे हे करोनारूपी संकट जाऊन आपल्या जीवनात पण सोनेरी पहाट होणार आहे.

फक्त या लॉकडाऊन च्या काळात सकारात्मक कार्य करायचे आहे. तुमच्या सर्वांच्या मोबाईल मध्ये नेट डाटा असतो त्याचा उपयोग पिक्चर , टिक-टॉक व्हिडीओ पाहणे व गेम खेळणे या करिता आपण वापरत असतो याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही फक्त नेट पँक खल्लास होतं व घटकाभर टाईमपास होतो. यामुळे आर्थिक फायदा होत तर नाहीच उलट नुकसान होतं.

तेव्हा सर्वांना नम्र विनंती आहे की या नेट पँकचा आपला व आपल्या गेट व जंगलाच्या उन्नतीसाठी उपयोग करा. सद्या तुम्ही आणि आम्ही म्हणजे शहरातील लोकं घरात अडकून पडलो आहे. आम्ही क्राँक्रीटच्या जंगलात आहो व तुम्ही खऱ्याखुऱ्या जंगलात आहात त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. तेेव्हा या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या, तुमच्या आजुबाजूच्या निसर्गाला बोलतं करा, निसर्गात होत जाणारे बदल, तुमच्या गावातील संस्कृती, खाद्य संस्कृती, देवळं, गढी, शेती व जंगलात घडणाऱ्या विविध घटना याबद्दल फेसबुक, वॉटसअप, युट्यब व स्वत: चे स्टेटस वर या गोष्टी लिहा… फोटो टाका…. लिहायला जमतं नसेल तर छोटे छोटे व्हिडीयो बनवून अपलोड करा….. सद्या नियमित फिरणारे निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी व पर्यटक घरात अडकून पडले आहेत सर्वत्र निराशेचे वातावरण पसरलेले आहे या वातावरणात तुम्ही घडविलेले निसर्गाचे दर्शन आम्हांला प्रेरणा व आनंद देतील व लॉकडाऊन संपल्यावर लगेच आमचे पावले जंगलाकडे वळतील व तुमचे रोजगार परत सुरू होतील…. तेव्हा सर्वांनी आपल्या भागाचे प्रमोशन करायला सुरवात करा… जेणे करून येणाऱ्या काळात तूमच्या भागातील वन पर्यटन वाढेल… तेव्हा कामाला लागा…. आम्ही सगळे तुमच्या माहीती ,फोटो व व्हिडीयो ची वाट पाहतो आहे.

अमोल सावंत, निसर्गकट्टा अकोला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here