10 फुटाच्या अजगर सापला दिला सर्पमित्रांनी जीवनदान

0
441

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या मोहर्ली येथील भूषण चूनारकर यांच्या घरातील बाथरूम मध्ये दळून बसलेला 10 फुटाचा अजगर सापला आज दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 च्या सुमारास दिला जीवनदान

प्राप्त माहितीनुसार अजगर साप हा मोहर्ली मामा तलाव परिसरातुन जवळील भूषण चूनारकर यांच्या घरातील बाथरूम मध्ये कुंडली मारून बसलेला होता. घरात मोठा साप बघून भूषण चूनारकर लगेच सर्पमित्र प्रवीण आत्राम यांना सूचना दिली.
माहिती मिळताच त्यांची चमु आपल्या छड़ी सोबत घटना स्थळी दाखल झाले. 10 फुटाचा अजगर साप बघण्यास संपूर्ण गाँव जमलेला होता. अजगर साप पकडण्यास जवळपास 30 मिनिट लागले. सर्पमित्र प्रवीण आत्राम व त्यांची चमु यांनी अजगर सापला पकडून कोणाची ही जीवित हानि न होता जंगल परिसरात रेस्क्यू केले.
सर्प मित्र प्रवीण आत्राम यांनी आपल्या आयुष्यात शेकडो विषारी व बिन विषारी साप याला जीवनदान दिले आहे व त्यांनी आपली एक टीम देखील तयार केलेली आहे.
गावात कुठेही साप निघाला तर प्रवीण ला कॉल करतात व तो आपले सारे काम बाजूला ठेऊन सर्प पकडण्यास जातो. त्यांनी मोहर्ली मध्ये बरेच सर्प मित्र तयार केले आहे. प्रवीण हा निस्वार्थ पणे आपला काम करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here