आलेवाही बिटात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

0
721

तळोधी बा.:
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील, वाढोणा येथील शेतकरी बैल मालक, उसटु दशरथ येसनसुरे, वाढोणा, यांचा बैल काल कळपात चारायला गेला असता देवारबोळी गट क्र. १२७२ या ठिकाणी वाघाने ठार मारले असल्याचे आज दिनांक 22 जानेवारी रोजी बैलाचा शोध घेतला असता निदर्शनास आले.

त्या संदर्भाने तळोधी बा. वनपरिक्षेत्र येथे कळविण्यात आले असता आज सकाळी आलेवाही बिटाचे वनरक्षक एस. बी. पेंदाम यांनी मोक्का पंचनामा केला. व घटनास्थळी कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहे.

यावेळेस मोक्यावर बैल मालक उसटु येसनसुरे,, गुराखी, शेतकरी, वनमजूर रामदीन, वाहन चालक दीपक बारसागडे, वनमजूर राहुल पिद्दुलवार, व ‘स्वाब नेचर केअर संस्था’ चे सदस्य उपस्थित होते. यांनी परिसरातील शेतकऱ्यांना फिरून वाघाचे वास्तव असल्याने सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले व तसेच शेतात काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजूरांना सांगितले. तसेच आज परिसरात गस्त सुरू सुद्धा ठेवलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here