चिचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; शव जंगलात २ कि.मी. दूर ओढत नेले

0
626

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):  मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सूर्यभान बाबाजी टिकले वय वर्षे ५८ हे आपल्या शेतात गेले असता तेव्हा अचानक वाघाने हल्ला करून ठार केले व त्याचे शव २ कि.मी. ओढत जानाळा जंगलातील कक्ष क्रमांक ५२२ येथे नेले.

सदर घटना ही आज दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमार घळली असून.मृतकांच्या शरीराचा काही भाग खाल्ला असल्याचे निर्दशनास आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस निरीक्षक परतेकी, वनविभाग प्रादेशिक व एफडीसीएम चे वनपरिक्षेत्र अधिकारी  गरूडे व बोढे, मूल येथील वन्यजीव मित्र उमेशसिंह झिरे, क्षेत्र सहाय्यक खणके, क्षेत्र सहाय्यक मस्के, क्षेत्र सहाय्यक कूमरे,  क्षेत्र सहाय्यक चौरे,वनरक्षक गुरनूले, मानकर,शीतल चौधरी, गवई,दीवटे, येसांबरे,सिंचन,यएनूरकर,गव्हारे हे उपस्थित होते. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदन करण्यासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे व पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here