मच्छिंद्र पार्डी शिवारात बिबट्याचा मृत्यू

0
340

माहूर :
दि.22 एप्रिल रोजी गुरुवार माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी शिवारात बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. सदर प्रकार विष प्रयोगाने घडल्याची चर्चा शुरू आहे.
मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात आज दि. २२ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास बिबट मृत अवस्थेत आढळून आला. लवकरच ही बातमी वा-यासारखी पसरल्याने घटना स्थळी लोकांची गर्दी जमा झाली.
सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी बी.पी. आडे, वनपाल मीर साजिद आली,एम बी. राठोड, वनरक्षक संतोष तीदेवाड, साहेबराव सोनकांबळे, कोटकर हे घटनास्थळावर पोहचून पुढील कार्यवाही केली. मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र पारडी येथील शेतात मंगळवारी रात्री अज्ञात वन्य प्राण्याने गायीच्या वासराची हत्या केली. मृत गायीच्या अर्ध शरीरावर विषबाधा झाल्यामुळे ही घटना घडल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

बिबट्याच्या मृत्यूच्या तपासासाठी वनविभागाने तातडीने कारवाई केली असता आरोपी विषप्रयोग झालेल्या प्रकाश जगनलाल जयस्वाल वय 54 यांनी कबूल केले.

मच्छिंद्र पार्डी च्या माहिती प्रमाणे रात्री शेतात धान्याच्या कोठारात दोन बैल, एक गाय आणि एक बैल बांधले होते.
कुत्र्यांच्या हल्ला झाल्याचे गृहीत धरून मृत बैलावर कीटकनाशक फेकले आणि त्याला जुन्या विहिरीत टाकले होतो असे अटक केलेल्या शेतक्यांनी कबुली दिली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान आडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here