वन विभाग , होमस्टे असोसिएशन व पर्यटक मार्गदर्शक समितीच्या संयुक्त विध्यमान ने वाघडोह  (T33) ला श्रद्धांजली अर्पित

0
905

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघडोह  (T33) नर वाघांची वृद्धावस्थेत मृत्यू झाले असल्याची घटना आज दि. 23 मई  2022  रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून वाघडोह (T33) नर वाघ हा लोकप्रिय होता वाघडोह (T33) नर वाघ कोळसा  क्षेत्रातुन आला होता आणि मोहर्ली क्षेत्रात दीर्घकाळ वास्तव्य होता त्यानंतर तो  वृद्धापकाळात ताडोबाच्या बफर झोनमध्ये जुनोना, लोहारा, मसाला परिसरात गेल्या ५ वर्षांपासून होता.  मागील काही दिवसांपासून  तो सिंन्हाळा परिसरात आला होता. वन विभागाने पाहणी केले असता त्यांना तो असक्त असल्याने वन विभागाची टीम लक्ष ठेऊन होते. त्याकाळात त्यांनी एक बकरी व एका वृद्ध इसमास ठार केले त्यांनी आपल्या 19 वर्षाच्या काळात मानवी हल्ला  न केला असल्याचे  सगळे आश्चर्यचकित झाले होते. तो आपल्या परिवाराची काळजी घेणारा उत्कृष्ट वडील म्हणून ओळखला जात होता . आकाराने मोठा असलेला हा नर वाघाचा मृत्यू मुळे सर्व वन्यजीव प्रेमी शोक व्यक्त करत आहे.

वाघडोह  (T33)च्या आत्मेला शांती मिळावी म्हणून  दि.23 मई 2022 रोजी सायंकाळी 7.00  वाजताच्या सुमारास  मोहर्ली गेट येथे होमस्टे असोसिएशन, आदिवासी ग्राम विकास पर्यटक मार्गदर्शक समिती आणि वनविभागाच्या संयुक्त विध्यमान ने ताडोबाच्या मोहर्ली गेटवर श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे संचालन मोहर्ली कोअरचे क्षेत्र सहायक विलास कोसनकर यांनी केले  तर सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे,वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) राघवेंद्र मून, होमस्टे संचालक आशिष पुराणिक, पर्यटक मार्गदर्शक अनिल तिवाडे, काजल निकोडे, शहनाज बेग व वन्यजीव प्रेमी यांनी मार्गदर्शन केले.
या वेळेस वन विभागाचे मोहर्ली (कोअर) वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कुमार गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी कोलारा, प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा सतीश शेंडे,  वनरक्षक विलास सोयाम, मोहर्ली होमस्टे असोसिएशनचे अध्यक्ष नाहिंद सिद्दिकी, मंगेश लांहमगे, हर्षल तारगे, विनोद सातपुते, सोनल आवारी, मुकेश शिवणकर, सुलेमान बेग तसेच आदिवासी ग्राम विकास पर्यटक मार्गदर्शक समितीचे अनिल तिवाडे, संतोष श्रीरामे, रंजन कोटरंगे, संजय मोंढे, नीलकंठ मगरे, संजय मानकर, सौ.गायत्री वाढई, सौ.वैशाली जुमडे, तेजस्विनी मोंढे, सौ.वर्षा जेंगठे आदि  पर्यटक मार्गदर्शक तसेच जिप्सी चालक-मालक व मोहर्ली गेट वरील पर्यटक व मोहर्ली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here