
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी):
बांम्बे नॆचरल हिस्ट्री सोसायटी अंतर्गत भारत विद्यालय पळसगाव जाट येथे बि. एन. एच. एस. यूनिटचॆ वतीने चीता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृत कार्यक्रम घेण्यात आला.
जगातील सर्वात वेगवान प्राणी चिता या प्राणी विषयी मागदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी चे बायोलाजीस्ट राकेश आहूजा यांनी चीता बद्दल सांगत त्याचा इतीहास, तो कूठे अधिवास करायचा, भारतातून कधी नामशेष झाला,जगात आज किती चिता शेष आहेत, याशिवाय त्याचे आयु॑मान , खाद्य, प्रजनन याविषयी सखोल मार्गदर्शन त्यानी विद्यार्थ्यांना मार्मिकतेने केले.
भारतातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात अधिवास मिळणारे 8 चिताचे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी टाळया वाजवून स्वागत करण्यात आले.
सदर कार्यकमाचे सऺचालन पर्यावरण दूत कु. खुशी मेश्राम व तन्मय कापगाते यांनी केले. तर अध्यक्ष म्हणून बोरकर सर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संजय कुमरे यांचे मार्गदर्शनात घेतले गेले. तसेच कार्यक्रमाला बि.एन.एच.एस चे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
