Google search engine
Home Breaking News हिंगोलीहून रेस्क्यू केलेल्या ८ फूट मगराला ताडोबातील इराई धरणात सुरक्षित पुनर्वसन

हिंगोलीहून रेस्क्यू केलेल्या ८ फूट मगराला ताडोबातील इराई धरणात सुरक्षित पुनर्वसन

0
568

मोहर्ली (मोहम्मद सुलेमान बेग) :

ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आंबेझरी कुटी, कक्ष क्रमांक 192 येथील इराई धरण परिसरात एका ८ फूट लांबीच्या मगराला वन विभागाच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे हिंगोली येथून रेस्क्यू करून आणलेले मागराला ताडोबा येथील त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले.

सदर मगर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आढळून आली होती. मानवी वस्तीजवळ मगर आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, वन विभागाने तातडीने कारवाई करत दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी त्या मगराला सुरक्षितरित्या पकडले.

या रेस्क्यू मोहिमेत हिंगोली प्रादेशिक वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मॅडम मीनाक्षी पवार, वनपाल एस. एस. चव्हाण, वनरक्षक सुधाकर कर्‍हाळे, वनरक्षक सारंग शिंदे आणि वनसेवक संग्राम भालेराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

यानंतर मगराला ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. येथे मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) संतोष तिपे, क्षेत्र सहाय्यक एस. जुमडे, आंबेझरी वनरक्षक दुष्यंत रामटेके तसेच इतर मदतनीस यांच्या सहकार्याने कोणतीही इजा न होता इराई धरणातील तिच्या नैसर्गिक अधिवासात तिला सुरक्षितरित्या सोडण्यात आले.

या यशस्वी रेस्क्यूमुळे एकीकडे मानव–वन्यजीव संघर्ष टळला, तर दुसरीकडे वन्यजीव संरक्षणाबाबत वन विभागाची तत्परता, समन्वय आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here