वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे यांना रानटी डुक्करच्या धडकेत गंभीर जखमी

0
283

तळोधी बा.(यश कायरकर):
वनविभागाचे तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक यांना दि. 24 मार्च 2022 रोजी रात्रीच्या सुमारास तळोधी वरुन बाळापुर कडे जात असताना गायमुख देवस्थाना जवळ रानटी डुक्करच्या धडकल्याने गंभीर अपघात झाला.
सदर घटनेत क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे 24 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास जेवन करण्यास नातेवाईकांकडे बाळापूरला जात असताना गायमुख देवस्थाना जवळ जंगलातून रस्त्यावर मोठ्या आकाराचा रानटी डुक्कर येऊन धडकल्याने कार्तिक दुचाकी घेऊन डांबरी रस्त्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. मात्र अजूनही बेशुद्ध अवस्थेतच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here