ताडोबा प्रशासनातर्फे पर्यटक मार्गदर्शकांना ड्रेसकोड

0
1857

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या  मोहर्ली प्रवेशद्वार येथील पर्यटक मार्गदर्शक यांना वनविभागातर्फे गणवेश वाटप आज दिनांक २५ जून २०२२ रोजी मोहर्ली प्रवेशद्वार येथील सभागृहात गणवेश, जोडे, कॅप, बेल्ट हे साहीत्य वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (कोर) अरुण गोंड यांच्या हस्ते देण्यात आले.

पर्यटक मार्गदर्शक स्वतःची जीवाची पर्वा न करता सतत सेवा देत असतात  व ते एक प्रकारे जंगल परिसरात पेट्रोलिंग करतात. जंगलात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवतात तसेच ताडोबा सफारी करिता येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती देऊन त्यांना जंगलाचे महत्त्व व वन्यजीव यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे व पर्यटकांच्या मनात वन्यजीव विषयी आवड निर्माण होईल अशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन करतात.


अशा या कौतुकास्पद कार्य करणाऱ्या पर्यटक मार्गदर्शक यांना वनविभागा तर्फे भेट स्वरूपात गणवेश देण्यात आले.
यावेळेस क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (कोर) विलास सोयाम, वनरक्षक पवन मंदुलवार व पर्यटक मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here