बिबटयाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

0
351

चिमूर : चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील शेतशिवारामध्ये काम करत असलेल्या भूषण सावसाकडे वय ४५ वर्षे, प्रकाश बोरकर वय ४० वर्षे सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास  बिबट्याने भूषण सावसाकडे या इसमावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात भूषण सावसाकडे गंभीर जखमी झाला असून त्याच्या हात – पाय आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत.

जखमी भूषण सावसाकडे यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी नेण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहे .चिमूर तालुक्याला ताडोबा अभयारण्य लागून असल्याने सर्व परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन देखील पहावयास मिळते. हा परिसर गर्द झाडीने व्यापलेला असल्याने तेथील रस्त्यावरून प्रवास करताना अनेक वेळा हिंसक प्राणी यांचे नेहमी दर्शन होत असतात. तसेच चिमूर परिसरात बिबट्या व पट्टेदार वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here