माजरी येथील नागरी वस्तीत वाघाचा हल्ल्यात युवक ठार

0
535

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात मूल ब्रह्मपुरी सावली तळोधी नंतर माजरी येथे वाघाचा हल्ल्यात एक युवक ठार झाल्याची घटना 24 ऑक्टोबर 2022 रोजी उघडकीस आली आहे.


मानव वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे दिसून येत आहेत कधी जंगलात तर कधी शेतात मानवाचे हल्ले होतच आहे पण आता तर नागरी वस्तीत वाघाने हल्ला केले आहे
सदर घटनेत मृतकाचे नाव दिपू सियाराम सिंग महतो वय (37) वर्ष असून तो एका खाजगी कंपनीत कार्यरत होता रात्री पाळी असल्याने तो  त्याच्या घराचा न्यू हाऊसिंग कॉलनी येथून कामावर जात असताना अचानक घरा मागून वाघाने येऊन हल्ला केला व त्याला फरफटात झुडपात नेले.
दिपू ने ओरडण्याचा आवाजामुळे परिसरातील नागरिक शोधाशोध केली असता त्यांना दिपू चा मृतदेह आढळला प्राप्त माहितीनुसार वाकोली क्षेत्र व नागरी वस्तीत  वाघांला अनेकांनी बरेच दिवसापासून बघितले आहे.
सदर घटनेमुळे नागरी वस्ती दहशत निर्माण झाली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here