ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन

0
613

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही जंगलाची सफारी खास या विद्यार्थ्यांसाठी दि. १८ ते २३ एप्रिल दरम्यान १७ शाळांतील ४०८ विद्यार्थी व ३२ शिक्षकानी या सफरीचा आनंद घेतला.

ताडोबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खुटवंडा, घोसरी, सोनेगाँव, मुधोली, काटवल (तुकुम), वडाळा, कोकेवाडा (मा.), विलोड़ा, आष्टा, कोकेवाडा (तु), किन्हाळा, अर्जुनी वायगाव (भो) या गावातील ७ प्राथमिक, ६ उच्च प्राथमिक व् ४ माध्यमिक शाळेतील विद्यार्थी ताडोबाच्या जंगल सफारीत सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या समारोपाला व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे उपस्थित होते. त्यानी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत ताडोबाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच ताडोबा नेहमीच या सारख्या उपक्रम राबविण्यास संधी देईल अशी भूमिका त्यांनी मांडली.


बीएनएचएसचे सहायक संचालक संजय करकरे यांनी परिसरातील विद्यार्थी व इतर गावकरी यांच्यासाठी ताडोबा किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले.

जंगल सफारी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी पांढरपवनीच्या बोडी नंबर 2 कडे ताडोबाची राणी माया नामक वाघीण आणि तिच्या सोबत असणारा एक नर वाघ गाडीच्या दिशेने येत असलेला बघून गाडीतील सर्व जणांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. व्याघ्र दर्शनाचा हा अनुभव त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला जाणार आहे.
यावेळी बीएनएचएसच्या संपदा करकरे यांनी ही विद्यार्थ्याशी संवाद साधत जंगलाचा आनंद घ्या व जंगलातील सर्व गोष्टी समजून घ्यावे असे त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन ताडोबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे व त्यांच्या सहकार्यानी केले. या सर्व विद्यार्थ्याना बीएनएचएसचे सौरभ दंदे व जगदीश धारणे यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here