तेंदुपत्ता तोडायला गेलेला इसम वाघाच्या हमल्यात ठार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना

0
359

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
सिंदेवाही वनपरिक्षेत्र व उपक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत नियतक्षेत्र कारगाटा कक्ष क्रमांक.२५७ येथे सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील इसम प्रकाश अंबादास वेटे (४५) हा तेंदू पत्ता संकलना करिता गेले असता वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना आज दि. 26 मे रोजी उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर हे आपली चमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले व सिंदेवाही पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनाकरिता  ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले व मृतकाचे परिवाराला तात्काळ मदत म्हणून 25000/- रु (पंचवीस हजार)  देण्यात आले.
यावेळी क्षेत्रसहाय्यक गटपायले व क्षेत्र सहाय्यक चुके, यांच्या सोबत वनरक्षक तोडसाम मैडम, वनरक्षक चौधरी, वनरक्षक चहांदे, वनरक्षक चिखराम, मडावी हे उपस्थित होते. घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले व परिसरातील लोकांना वनविभागामार्फत परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे जंगलाच्या आत मध्ये प्रवेश करू नये अशा सूचना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here