कापूस वेचण्यास गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

0
578

पोंभूर्णा :

पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक महिलेचे नाव बेबीबाई हनुमान घोडरे वय 55 वर्ष ती कसरगट्टा येथील रहिवासी आहे. कसरगट्टा गावालगत असलेल्या कविटबोळी शेतशिवारात सर्वे क्र. 55 मध्ये गंगाराम मोहन घोडरे यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली असता जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असता वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृत महिलेला शवविच्छेदना करिता प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले.
या परिसरात वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे व तसेच वाघाचा बंदोबस्त त्वरीत करण्याची मागणी गावकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here