.तर एक करोड मदत द्या ; कुटूंबीयांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या ; वनकर्मचार्यांची मागणी ; उपसंचालकांना दिले निवेदन

0
466

चंद्रपूर

अखिल भारतीय वाघ्र प्रगणनेचा कार्यक्रम ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात सूरू झाला आहे.प्रगणनेचा पहील्याच दिवशी कोलारा ( कोर ) वनक्षेत्रात स्वाती ढूमणे ही महीला वनरक्षक वाघाचा हल्याची बळी ठरली.
या घटनेने वनकर्मचार्यात दहशत पसरली आहे. वनकर्मचार्यांनी ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पाचा उपसंचालक ( बफर ) यांना निवेदन दिले.
या निवेदनातून त्यांनी विविध मागण्या पुढे ठेवल्या आहेत. व्याघ्र प्रगणेचा कालावधी नोव्हेंबर ऐवजी फेब्रुवारी ,मार्च मध्ये ठेवावा,ट्राझीट लाईनवर चालण्याची वेळ 6.30 ऐवजी 10 ठेवा,15 कि.मी.चालण्याची पध्दत बंद करून कॕमेरा ट्रप व्दारे पर्यायी प्रगणना करावी,कर्तव्यावर असतांना मृत्यू झाल्यास एक करोड आर्थिक मदत तथा कुटूंबियांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे,अशा मागण्या वनकर्मचार्यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here