तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र वाघाची शिकार ; वाघाचे अवशेष व वापरलेले अवजारे जप्त उमरेड बसस्थानक परिसरात वाघाचे दात व नखांसह 5 आरोपींना अटक

0
1187

तळोधी (बा.):

नागपूर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 23/11/2021 ला उमरेड बसस्थानकचे जवळ वाघाच्या दातांची विक्री होणार असल्याचे कळताच नागपूर वनविभागातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाव्दारे सापळा रचुन 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे व सायबर सेल, मेळघाट यांच्या मदतीने आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आले. उक्त प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपींची नावे अनुक्रमे 1) ताराचंद महादेव नेवारे, वय 41 वर्ष, रा. खडकळा, 2) दिनेश नकटु कुंभले, वय 30 वर्ष, रा.वाढोणा, 3) अजय राजुजी भानारकर, वय 24 वर्ष, रा. वाढोणा, 4) प्रेमचंद वाघाडे, वय 50 वर्ष, रा.सोनपुर (तुकूम), पो.पळसगांव, व 5) राजु कुळमेथे, वय 38 वर्ष, रा.खडकळा ता. नागभीड, जि.चंद्रपुर, असे सर्व तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटा अंतर्गत आरोपी असून त्यांचे विरुध्द वनगुन्हा क्र. 04882/122035 दि. 23/11/2021 अन्वये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे विविध कलमाव्दारे वनगुन्हा नोंदविण्यात आला.
या संदर्भात पुढील चौकशी करण्यासाठी सदर आरोपींना सुचविलेल्या संकेतस्थळावर 25/11/2021 ला आनन्यात आले. हे वाघांचे अवशेष प्रेमदास वाघाडे, सोनापुर याने आपल्या शेतात मृत वाघाला पुरुण ठेवले त्या घटना स्थळी जाऊन पुरण्यात आलेल्या वाघाचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष काढून हस्तगत करण्यात आले. व नंतर आरोपींच्या घरांची तपासणी करून सदर घटनेत वापरलेले अवजारे सुध्दा हस्तगत करण्यात आले. मात्र यात शिकार केला गेलेला वाघ/वाघीण हा अंदाजे 6 ते 10 महीने वयाचा असावा असे मिळालेल्या अवशेषा वरुन निदर्शनास आले. मात्र या वाघाच्या शिकारी प्रकरणातील पुन्हा कोणी सुत्रधार अजुनही मोकळा असावा असी चर्चा परिसरात सुरू आहे.
या मोक्याच्या तपासणी वेळी कु.कोमल एम. गजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण उमरेड यांचे समवेत चौगुले,अगळे, भिसे सर्व वनपाल व कॉपले, नरवास, पेंदाम, श्रीरामे, हेडावू सर्व वनरक्षक आणि इतर दक्षिण उमरेड व तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडने, क्षेत्र सहाय्यक,के.डी.गरमडे तळोधी, क्षेत्र सहाय्यक गायकवाड गोविंदपुर, क्षेत्र सहाय्यक रासेकर नेरी, वनरक्षक एस.बी.पेंदाम, वनरक्षक एस.एस. कुळमेथे, वनरक्षक एस.एस.गौरकर, वनरक्षक श्रिरामे, वन मजूर ऊईके, वाघाडे, वन्यजीव प्रेमी यश कायरकर, जिवेश सयाम हे उपस्थित होते. प्रस्तुत प्रकरणी पुढिल तपास एन.जी. चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2), उमरेड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here