जनकापूर येथे बिबट्याने एकाच दिवशी गोठ्यातील तीन शेळ्या व कुत्र्याला केले ठार.

0
449

तळोधी (बा) : (यश कायरकर ) नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे मागील अनेक दिवसापासून बिबट्याचा धुमाकुड सुरू असून अनेक शेतकऱ्याच्या शेळ्या-बकऱ्या फस्त करीत असण्याचे घटना घडली असून दिनांक 27 मार्च 2022 रोजी रात्रीच्या सुमारास  दयाराम गुरूनुले यांचे मालकीचे तीन शेळ्या गोठ्यात ठार करून बिबट्या जंगलात पसार झाला व त्याच रात्री काही अतंरावर पुन्हा कृष्णाजी काशीवार यांचे आवारातील पाळिव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले व जंगलात घेवून पसार झाला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ग्रामीण भागातील अनेक कुंटुबातील व्यक्ती घराबाहेर अंगणात झोपतात. अशा वेळेस जर बिबट्या ने मनुष्यावर हल्ला केला तर जिवित हानी नाकारता येत नाही. तेव्हा या परिसरात वावरत असणाऱ्या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा. असी मागणी माजी उपसरपंच सचिन मसराम, माजी ग्र.प.सदस्य राहुल रामटेके, प्रतिष्टीत नागरीक कृष्णाजी काशीवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गिरिधर बोरकर, सागर काशीवार यांनी केली आहे.
बरेच दिवसापासुन शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांना बिबट्याने भक्ष बनविल्याने शेतकऱ्यावर सकंट कोसळले आहे.

सदर घटनेची माहिती वनरक्षक जी.एम नवघडे यांना मिळतात घटना स्थळी दाखल झाले व मौका पंचनाम केला व ग्रामस्थांना सावध राहण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here