वाघ व बिबट्याच्या झुंजीत बिबट ठार ;  वाघ जखमी असल्याचे वन विभागाचे अंदाज

0
626

गडचिरोली :- गडचिरोली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 171 मध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. 26 जून 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार वनकर्मचारी जंगलात गस्त करीत असताना बिबट्या मृतावस्थेत आढळला सदर घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दिली व माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहाय्यक श्रीकांत नवघरे, वनरक्षक राठोड, भसारकर, हेंमके व वाघ सनियंत्रण पथक गडचिरोली, व अधीनस्त संपूर्ण वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते.
सदर घटनेत मृत बिबट्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आले व तसेच जवळच पट्टेदार वाघाचे पगमार्क मिळाले आहे.
वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाघ व बिबट्याच्या झुंजित बिबट्याचा मृत्यू झाला असावा व या दोघांच्या झुंजित वाघ देखील जखमी झाले असल्याचे अंदाज वनविभागाने केला असून गावकऱ्यांनी जंगलात जाऊ नये असे आव्हान सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले आहे.
मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून रासायनिक तपासणी करिता नमुने घेण्यात आले आहे.
सदर घटनेची चौकशी उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.

सदर कार्यवाहीत मानद वन्यजीव सचिव मिलींद उमरे, वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर, ग्रामपंचायत वाकडी सरपंचा सौ. सारिता चौधरी व पोलीस पाटील देवेंद्र वाकडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here