बिबट कुत्र्याचा पाठलग करत असतांना दोघांचा मृत्यू

0
333

हिंगणा :-

हिंगणा वन परिक्षेत्रातील मौजा दाभा येथील विजय काकडे यांच्या शेता मध्ये दि. २६/०९/२०२१ ला पाणी साठवण पाणीच्या टाक्या मध्ये कुत्र्याचा पाठलाग करत असताना  बिबट  पाण्यात पडून मृत्यु झाल्याची माहिती  वन विभागाला मिळताच लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणा, आशिष निनावे, सदस्य वन्यजीव सल्लागार मंडळ, महाराष्ट्र राज्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक, अविनाश लोंढे, सौरभ सुखदेवें, यांनी घटना स्थळी पोहचले.
तेथील पाणी साठवन टाका २.५ मीटर खोल मृत मादा बिबट वय अंदाजे ५ ते ६ वर्षे व पाठलाग केलीला कुत्रा सुद्धा मृतावस्थेत त्याच टाक्यात आढळून आला.
सदर घटनेची माहिती मा. उप वनसंरक्षक नागपूर डॉ.भारत सिंह हाडा व सहायक वनसंरक्षक, एस. टी. काळे व पशुधन विकास अधिकारी, श्रीमती लांजेवार यांना देण्यात आली.

सदर बिबटचे शवविच्छेदन करून त्याला नंतर दहन करण्यात आले. तसेच त्यांचे संपूर्ण नमुने प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठवण्यात आले आहे.
सदर शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी श्रीमती लांजेवार, डॉ सय्यद बिलाल अली, डॉ मयूर काटे यांच्या देखरेखी खाली करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे निर्देशानुसार घटनास्थळी मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी अविनाश लोंढे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रतिनिधी कुंदन हाते उपस्थित होते.
पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती डॉ.भारत सिंह हाडा
उपवनसंरक्षक,नागपूर वनविभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध पत्रका द्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here