अकोला जिल्ह्यातील सोनखास-मोझर वन परिसरात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात खळवळ

0
477

अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी  तालुक्यातील सोनखास-मोझर वनपरिसरात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत दि.28  जून 2022 रोजी सकाळी 7 वाजातच्या सुमरास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

सदर घटनेची माहिती वनविभागा मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मौका पंचनामा केला व मृत वाघाला शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सोनखास-मोझर वनपरिसराच्या जलस्वराजच्या विहिरीच्या काही अंतरावर असलेल्या नदीच्या काठावर एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत अमोल इंगोले, मंगेश मुळे, गणेश पवार या तिघांना दिसला.


सुरुवातीला वाघ झोपुन असल्याचे गावकऱ्यांना वाटले होते, मात्र काही काळा नंतर देखील हालचाल न झाल्याने त्यांना संशय आला व काही जणांनी त्याच्या जवळ जाऊन बघितले तेव्हा त्यांना वाघ मृत अवस्थेत दिसला.
वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे? याबाबत शंका उपस्थित होत आहे.
मृत वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे.
वनविभाग पिंजर पो. स्टेशनसह संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जवान  रुग्णवाहिका सह दाखल झाले व पुढील कारवाही वन विभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here