रानटी डुकराच्या हल्ल्यात दोन इसम गंभीर जखमी

0
352

सावली : सावली तालुक्यातील चकपिरंजी गावातील दोन इसमावर आज दि. २९ ऑगस्ट २०२२  रोजी सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास रानटी डुकराने हल्ला करून जखमी केले आहे.
सदर घटनेत जखमीचे नाव मार्कंडी नारायण तोरे व वासुदेव डोनू नागपुरे असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील मार्कंडी नारायण तोरे  नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या घरासमोरील अंगणात ब्रश करत असतांना व वासुदेव डोनू नागपुरे  गावातील पाण्याचा टाकीजवळ उभे असताना  अचानक त्यांच्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
घराजवळील लोकांनी रानटी डुकरांना हाकलून काढण्यासाठी  आरडाओरड केले असता रानटी डुकर जंगलाच्या दिशेने पळून गेले.
सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्यात यावे व रानटी डुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here