भंडारा येथील (PSBS) ने केले खवल्या मांजरला रेस्क्यू

0
538

भंडारा :- भंडारा येथिल आंबेडकर वॉर्डातील गणेशपूर येथे विकास वाहने यांचा घराच्या मागच्या परिसरातील मेश्राम यांचा अंगणातील एका विहिरी जवळ खवल्या मांजर एका कोपऱ्यात बसलेला असल्याची दि. 29 मई 2022 रोजी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सदर घटनेची माहिती विकास वाहने यांनी यशवंत सोनकुसरे जिल्हा परिषद सदस्य यांना दिली व त्यांनी ही माहिती लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व PSBS (पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था)च्या पदाधिकाऱ्यांना दिली असता, यात वन्यजीव बचाव व संरक्षणासाठी  काम करणारे निहाल गणवीर व निशांत खंडागडे यांचा सोबत घटनास्थळी दाखल झाले.
खवल्या मांजर हा दुर्मिळ प्राण्यांच्या यादी मध्ये येतो व त्याची तस्करी सुद्धा केली जाते. खवल्या मांजरची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात.  आंतरराष्ट्रीय बाजारात यांची खूब मागणी असल्यामुळे खवल्या मांजर हे खूप किमतीत विकल्या जाते.
PSBS (पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था) संस्था चे निहाल गणवीर यांनी त्या खवल्या मांजरला पकडून बंदीस्त केले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर घटनेच्या वेळी उपवनसंरक्षक गवई यांच्या उपस्थितीत  फिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधीकारी संजय मेंढे, अधिनस्त कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
खवल्या मांजरची तपासणी करून योग्य स्थितीत असल्यामुळे उप वनसंरक्षक गवई यांनी लगेच रात्रीला खवल्या मांजरीला जंगलात सोडण्याचे आदेश दिले व त्याला त्याच्या अधिवासात जंगलात  सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here