खवले मांजर (Pangolin)ची शिकार;  तीन आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश

0
912

भंडारा:  :
नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या भजेपार/ गोंडीटोला शेती परिसरात खवले मांजर (pangolin)ची शिकार करून त्याची मटण कापत असल्याची मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कौशिक यांनी गोंडीटोला येथील शिवकुमार बारकु कोडवते वय (33), मनोहर शामराव मसराम वय (30), राकेश टिकाराम कोडवते वय (22) हे आपल्या राहत्या घरात खवले मांजराचे मटण कापत असताना घटनास्थळी पकडण्यात आले. त्यावेळी खवले मांजरच्या 75% पेक्षा जास्त भाग कापण्यात आले होते.
सदर घटनास्थळी  कापलेला खवले, मांजरीचे मटण व तसेच त्याला कापण्यासाठी वापरण्यात आलेले अवजारे कुऱ्हाड, पावशी (वीळा) खवले मांजराचे कापलेले मटण, खवले, काळीज, आतडी जप्त करण्यात आले.
ही सर्व कार्यवाही मा. वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांचे मार्गदर्शनात वनरक्षक शिवराज पिसाळ , धनंजय कोकाटे , स्वप्नील पायघान, सुनील भालेराव , सागर भेलावे , प्रणय वालदे, महेश रहांगडाले  यांनी केली व  पुढील कारवाही करिता वनपरिक्षेत्र तिरोडा (प्रा.) यांच्या स्वाधीन करण्यात आले.  त्यानंतर प्रसुरी क्र. 03/104107/2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी योगेंद्र सिंह IFS (परिविक्षाधीन), वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक व कर्मचारी करीत आहेत व तसेच या सर्व कामा करिता पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था भंडारा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here