
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील बेलारा गेट परिसरात आज सकाळच्या सफारीदरम्यान झायलो नामक प्रसिद्ध वाघाचे दर्शन झाले असून, पर्यटकांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला आहे.
झायलो हा जुनोना-देवाडा परिसरातील प्रमुख नर वाघ असून, 2023 नंतर तो ताडोबाच्या बेलारा बफर क्षेत्रात नियमितपणे दिसू लागला आहे. त्याची टेरिटरी अतिशय विस्तीर्ण असल्याने तो साधारण दहा ते पंधरा दिवसांनंतर एकदा दर्शन देतो.
झायलोच्या क्षेत्रात सध्या चार माद्या आढळतात — वीरा, बेला, जनाबाई आणि महाराणी.
आज मात्र झायलो आपल्या sub-adult बछड्यासोबत सकाळच्या सफारीदरम्यान दिसला. हा रोमांचक क्षण पर्यटक श्वेता सुर्वे आणि मुग्धा यांनी त्यांच्या सफारी दरम्यान किशोर तोडसे (वनपर्यटन मार्गदर्शक) यांच्या सोबत आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
या दर्शनामुळे पर्यटकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
ताडोबाच्या जंगलात अशा प्रसंगी मिळणारे वाघाचे दर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाशी जवळीक साधण्याचा आशीर्वादच!


 
                