
चंद्रपूर :
‘साप, अंधश्रद्धा व कायदा’ या विषयावर स्वाब संस्था, व पोलीस स्टेशन तळोधी यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडतात. या मध्ये सापांबध्दल अज्ञान व अंधश्रद्धा यामुळे लोक जीव गमावतात, त्यामुळे अशा घटनांमध्ये किमान आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्याही गावात जिवीत हानी होऊ नये.” असं तळोधी पोलीस स्टेशन चे निरिक्षक राहुल गुहे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले. या करीता पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटलांना बोलावून पोलीस स्टेशन तळोदी बाळापूर येथे हा सापांबध्दलचा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तळोधी पोलीस स्टेशन चे निरिक्षक राहुल गुहे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यांनी कार्यक्रमाबद्दल मत मांडली व या मार्गदर्शन कार्यक्रमाचे महत्त्व समजून सांगितले.
त्यानंतर मार्गदर्शक संस्थेचे सर्पमित्र व बचाव दल प्रमुख जिवेश सयाम यांनी सापांच्या विविध प्रजाती, त्यांची ओळख व सापाची मनुष्याला असलेली भीती, परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी, बिनविषारी व निमविषारी सापाबद्दल माहिती देत सर्पदंशाचे कारण आणि सर्पदंश टाळून नेण्याकरता घ्यावयाची काळजी, व उपाय योजना याबद्दल माहिती दिली. “विषारी साप मोजकेच मात्र सारखेच दिसनारे बिनविषारी साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कोणताही साप चावल्यास घाबरून जाऊ नये” असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी मार्गदर्शन करताना, “कोणतेही जहर मंत्राच्या साह्याने उतरवत नाही.कोणत्याही बुवा बाबाच्या व नागमोत्यांच्या आहारी जाऊ नये आपले जीव वाचवण्याकरता दवाखान्यातच जाऊन उपचार करा व जर कोणी असे करत असेल तर त्याकरिता जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या कलम 2 (ख), अनुसूची 9 नुसार कठोर कारवाई होऊ शकते. अशी तरतूद केली आहे.” हे सांगितले.
यावेळी तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटील SWAB संस्थेचे संपूर्ण सदस्य व या कार्यक्रमाला पी.एस.आय. किशोर मानकर, पी.एस.आय. भास्कर पिसे, तथा संपूर्ण पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, स्वाब संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
