मागरुड बिट अंतर्गत शेतशीवारात पकडला लाखो रुपयेचा सागवान लाकूड

0
277

घोडाझरी वन्यजीव अभयारण्य परिसरात वृक्षतोड प्रकरण

मांगरुड बिटातील रानबोळी व डोंगरतळा(ढोरकळा) परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रकरण लवकरच उजेडात येण्याचे संकेत.
सतत तीन दिवस धाडसत्र व साग लाकडे जप्तीची कारवाई सुरू.
आत्ता वनक्षेत्रात होनार्या बिट चौकशी, व कारवाई याकडे परिसरातील लोकांचे लक्ष.

तळोधी (बा.) यश कायरकर :
वन्यजीव रक्षणाचे हेतूने अलीकडेच घोषित करण्यात आलेल्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षतोडीचे प्रकरण सुरू आहे. याच संदर्भात गुप्त माहिती च्या आधारे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात नियक्षेत- हुमा मधील श्री मधुकर सातपैसे, रा.मांगरुड यांच्या शेतात गट क्रं.१६३ मध्ये तनसिच्या ढिगार्यात लपवून ठेवलेली लाखों रुपये किंमतीची सागाची लाकडे पकडण्यात आले. त्या नंतर दुसऱ्या दिवशी सुध्दा अशाच प्रकारे त्याच परिसरात लपविलेले सागवान ची लाकडे पकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.
या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र नागभीड मधील मंगरुड बिटात येत असलेल्या रानबोळी, व डोंगरकडा (ढोरकळा), खरबी तलाव पाळ, परिसरात,व घोडाझरी या घनदाट जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्याची चर्चा परिसरात घुमू लागली आहे.
या वृक्षतोड प्रकरणात प्रस्तापित वनकर्मचारी, बिट रक्षक, यांच्या च सहकार्याने ही वृक्षतोड होत असल्याची चर्चा सध्या मांगरुड,किटाळी,खळकी,खरबी परिसरात लोकांत चर्चेत आहे. या सुरू असलेल्या लाकुड तस्करीच्या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी नैसर्गिक वनवा च्या नावाखाली मानवी प्रयत्न करून वृक्षतोड झालेल्या झाडांच्या बुंध्याला जाळून नष्ट करण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले आहे अशी गुफ्तगू सुरू असुन, सखोल चौकशी केल्यास करोडो रुपये किंमतीची शेंकडों सागवान वृक्ष तोडीचे बिंग उघडकीस येण्याची, माहिती पुढे येण्याचे संकेत आहे. येवढे धाडसत्र वरिष्ठ अधिकारी करीत आहेत मात्र स्थानिक वनकर्मचारी वनरक्षक यांना कशी काय निमीशमात्र ही कल्पना नव्हती?
मात्र नैसर्गिक व वनवा लागला असल्याचे कारण पुढे करण्यात आल्याची गुप्त माहिती आहे. यासंदर्भात वन विभागाने कार्यवाही चे सूत्र चालविले असुन दररोजच्या कार्यवाहीत लाकूड मिळत असून चौकशी सुरू असल्याने वनविभागाने काही माहिती उघड न करता गुलदस्त्यात बंदीस्त ठेवली आहे. मात्र लवकरच सविस्तर वृत्त बाहेर येणार आहे. यासंदर्भात वन विभागाचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र स्तरावरून विचारणा केली असता चौकशी व कार्यवाही सुरू असल्याने सध्यातरी सविस्तर माहिती देण्यास असमर्थता विषद केली आहे.
मात्र अजूनही  मधुकर सातपैसे यांच्याशेतातील तनसिच्या ढिगार्यात लपवून ठेवली सागवान लाकूड पकडून सुध्दा संबंधित व्यक्ती वर कोणती कार्यवाही करन्यात येनार आहे.? सोबतच स्थानिक वनकर्मचारी यांच्या संशयास्पद भुमिकेबध्दल चौकशी होणार काय ? व कोणत्या प्रकारची कार्यवाही करन्यात येनार आहे? या बाबतची प्रश्न व उत्सुकता परिसरातील ग्रामस्थांद्वारे उद्भवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here