नखासाठी गर्भवती वाघिणीची निर्घुणपणे हत्‍या करणाऱ्या आरोपीना अटक

0
202

पांढरकवडा:
यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुंदवाडी परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनक्षेत्र कक्ष क्रमांक 30 मध्ये दि. 25 एप्रिल रोजी 10.30 वाजता सकाळच्या सुमारास एका गर्भवती वाघिणीचा निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना वन विभागाच्या गस्ती दरम्यान उघडकीस आली होती. वाघिण गुहेत आराम करत असताना ही घटना घडली होती.
त्यानंतर त्याच दिवशी सर्व नियमावली पाळून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूने शवविच्छेदन केले. अहवालानुसार वाघिणीच्या मानेवर व छातीवर जखमेची खूण दिसून आले तसेच अहवालामध्ये तिचे पोट खाली असल्याचे म्हटले आहे व ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे नमूद आहे याबाबत प्रा. गु.री. क्रमांक 62/03 दि. 25 एप्रिल रोजी नोंद करण्यात आला. सदर घटनेची तपासणी वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुंटवन व्ही. जी. वारे हे करीत होते.

सदर घटना ही गंभीर असल्याने डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी घटना स्थळाला भेट दिली व घटना स्थळाची पाहणी केली. तसेच यावेळी संजय पुजलवार, उप अधिक्षक वणी, प्रदीप पाटील, उप अधिक्षक, पांढरकवडा, प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक हे हजर होते. तसेच वनविभागाचे उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक हजर होते. त्यांनी घटना स्थळाची पाहणी करून डॉग स्कॉट, फिंगरप्रिंट तज्ञ यांना बोलावून स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, उपविभाग वणीची टीम, उपविभाग पांढरकवडाची एक टीम अशा 4 टीम तयार करून गुन्ह्याची लवकरात लवकर मार्गी लावले.
सदर टीम वेगवेगळ्या दिशेने तपास करून गुन्हा उघडकीस करण्यात आला. आरोपी अशोक लेतू आत्राम वय 20 वर्ष व लेतु रामा आत्राम वय 45 वर्ष हे दोघेही राहणार पांढरवणी तालुका झरी जिल्हा यवतमाळ येथील यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून वाघ नख मुकुटवन परिक्षेत्रात मांगुर्ला क्षेत्रातील कक्ष क्र. 30 मध्ये मृत अवस्थेत मिळालेली वाघिणीचे पायाचा एक पंजा ताब्यात घेण्यात आला.
सदर गुन्ह्यात आणखी आरोपीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे मृत वाघिणीचा एक पंजा व 9 नखे जप्‍त करण्‍यात पोलीस टीम तथा वनविभागाच्या टीमला यश मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here