मोहर्ली येथे वन्यजीव सप्ताह संपन्न

0
215

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली कोर व बफ़र क्षेत्रातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 01 ऑक्टोबर 2021 रोज जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त मोहर्ली ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने साफसफाई करण्यात आले. तसेच डब्ल्यू.पी. एस. आय. तर्फे वन व वन्यजीव विषयी ग्रामस्थांमध्ये प्रेम व प्रतिष्ठान निर्माण होण्यासाठी वन्यजीव चित्रपट मोहर्ली गावातील ग्रामपंचायतच्या पटांगणात दाखविण्यात आले
यावेळेस मोहर्ली (वन्यजीव) क्षेत्रसहायक विलास कोसनकर, मोहर्ली बफर क्षेत्रसहायक मल्लेलवार, मोहर्ली (वन्यजीव) वन रक्षक देशमुख, पवन मंदुलवार, वनमंजूर, मोहर्ली गट ग्रामपंचायत सरपंच सौ सुनीता कातकर, माजी उपसरपंच राजू ढवले, मोहर्ली गेटचे पर्यटक मार्गदर्शक व तसेच मोठ्या संख्येने एकत्रित झालेले ग्रामस्थ.उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here