वनपरिक्षेत्र मूल (बफर ) व संजीवन पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह संपन्न

0
373

आज दिनांक 1/10/2021 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचीत्य साधुन वन्यजीव सप्ताहा निमीत्य वनपरिक्षेत्र कार्यालय, मूल ( बफर ) व संजीवन पर्यावरण संस्था, मूल यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तर्फे चंद्रपुर रेंजर कॉलेज मधुन निघालेल्या रॉलीच्या स्वागताचा कार्यक्रमाचे आयोजन कर्मविर महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात संजीवन पर्यावरण संस्थे तर्फे वन्यजीव छायाचीत्र प्रदर्शनी व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक छत्तीसगड मेजर, सह संचालक छत्तीसगड अग्रवाल, विभागीय वनाधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भागवत, डी एफ ओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प काळे, ईको प्रो अध्यक्ष बंडु धोत्रे, सहाय्यक उप वनसंरक्षक येले आदि उपस्थीत होते.


कार्यक्रमाच्या यशश्वीतेेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांचे मार्गदर्शनात मुल बफर वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी, विषेश व्याघ्र संरक्षन दलाचे कर्मचारी, वन व्यवस्थापन समीतीचे सर्व सदस्य व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, प्रशांत केदार, स्वप्नील आक्केवार, मनोज रणदिवे, प्रभाकर धोटे,दिनेश खेवले, अंकुश वानी, सुशांत आक्केवार,रीतेश पीजदुरकर, अनुराग मोहुर्ले, हर्षल वाडके, यश मोहुर्ले, तन्मयसिंह झिरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन जोशी, क्षेत्र सहाय्यक यांनी तर आभार प्रदर्शन संजीवन पर्यावरण संस्थेचे राहुल जीरकुंटवार यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here