TATR मध्ये जिप्सी सफारी दरम्यान वृद्ध पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
126

चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोलारा कोर क्षेत्रात जिप्सी सफारी दरम्यान दिनांक 01 मे 2023 रोजी दुपार सफारीत आपले कुटुंबीयांसोबत सफारी करत असताना काळा आंबा परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने पर्यटकांचा मृत्यू. सदर घटनेत मृतकाचे नाव केशव रामचंद्र बालगी रा. मुंबई वय 71 वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (कोर) परिक्षेत्रातील कोलारा प्रवेशद्वारने आपले कुटुंबीयांसोबत दुपार फेरीत जिप्सी सफारी करत असताना अचानक वृद्ध पर्यटकास हृदयविकाराचा तीव्र झटका येताच लगेच पर्यटक मार्गदर्शक व वाहन चालक यांनी तात्काळ पर्यटन वाहन लगेच जंगला बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ (बु) येथे आणले तेथील वैद्यकीय अधिकारी त्यांनी तपास केले असता त्यांनी मृत घोषित केले.
ताडोबा प्रशासनाकडून मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना धीर देऊन सात्वन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here