नागपूरचे अविनाश लोंढे आणि गडचिरोलीचे उदय पटेल यांना वन्यजीव संरक्षक म्हणून नियुक्त केले

0
209

राज्य सरकार ने मानद वन्यजीव रक्षक म्हणून नागपूरचा अविनाश लोंढे आणि गडचिरोलीचे उदय पटेल यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. वनविभागाने 1 जून 2021 मंगळवार रोजी यासंदर्भात एक आदेश जारी केलेला आहे त्यानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत मानद वन्यजीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. यापूर्वी सरकारने 48 मानस वन्यजीव रक्षक नेमले होते.

मानव वन्यजीव रक्षकाला कारवाईसाठी वन अधिकाऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही त्याला वन्यजीव सरंक्षक कायद्यातील (1972) 55 (ब) खालील अधिकार प्राप्त झालेले आहेत .त्यामुळे वन्यजीव कायद्याअंतर्गत अनुसुचित समाविष्ट प्राणी पक्ष्यांची विक्री त्याची शिकार किंवा काही गैरप्रकार होत असल्यास तो स्वतः न्यायालयात खटला दाखल करू शकणार आहे.
याबाबत अधिसूचित काढण्यात आली आहे .प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाइल्ड लाइफ वॉर्डन असतो त्यांना कोणतेही मानधन नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here