तळोधी बा. येथे वनपरिक्षेत्र अधिकारी नेमके कोण..?

0
170

( स्थायी नियुक्त अधिकाऱ्याचा उपस्थितीत ही  कारभार  दोन वर्षांपासुन आळिपाळीने प्रभारीवरच)

तळोधी (बा.) :- तळोधी बा.येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची गेले दोन वर्षापासून नियुक्ती करण्यात आली असुन ही नियुक्त अधिकाऱ्याचा  कारभार  दोन वर्षां पासुन आळिपाळीने प्रभारीवरच सोपविण्यात येत असल्यामुळे  तळोधी (बा) येथे  नेमके वनपरिक्षेत्र अधिकारी कोण ? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनाच नाही तर वन कर्मचाऱ्यांना सुद्धा पडलेला आहे. 15 दिवस महिनाभरात आलटून पालटून प्रभार या आणि त्या अधिकाऱ्यांकडे जात असल्यामुळे  पारीसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

येथे  दोन वर्षांपूर्वी अभिलाषा सोनटक्के ह्या बदलुन गेल्यानंतर पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणुन कु. सोनाली कडनोर ह्या वनपरिक्षेत्र अधिकारी नियुक्ती करण्यात आलेली होती मात्र प्रसूती रजा व बालसंगोपन रजे करीता जवळपास एक वर्ष त्यात सुट्टीवर असल्यामुळे कैलास धोंडने यांच्याकडे एक वर्ष प्रभार राहिला त्यानंतर पुन्हा कडनोर मैडम रुजू झाल्या, व जवळपास तीन महिने त्यांनी  कार्यभार सांभाळला त्यानंतर प्रशिक्षणाकरिता गेल्यानंतर त्या परतल्याच नाही व पुन्हा सामाजिक वनीकरणचे  महेश गायकवाड यांच्याकडे प्रभार देण्यात आला मात्र त्यानंतर कधी महेश गायकवाड तर कधी सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला. यामुळे येथील जनतेला पक्के माहिती नसते की आपल्या वनपरिक्षेत्राचा वनपरिक्षेत्र अधिकारी कोण आहे ?
मागील दोन वर्षापासून तळोधी  बा.. वनपरीक्षेत्रधिकारीचा कारभार आलटून पालटून  प्रभारी कडेच  असून  नागरीकांना  यामुळें विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ब्रह्मपु्री  वनविभाग  अंतर्गत येत असलेल्या तळोधी     ( बा.)   वनपरिक्षेत्र विस्ताराने मोठा असून हा अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त शेत्या आणि गांव आहेत. तळोधी बा. वनपरिक्षेत्रांतर्गत 3. उप क्षेत्र, 13.बीट ,असून एकूण 56. गावे आहेत. मात्र फक्त 8. वनरक्षक  कर्तव्यावर  आहेत  बाकी जागा रिक्त असून   इतर ठिकाणी बीटाचा कारभार  प्रभारीवरच चालवत आहेत.
यातही एकिकडे एका तळोधी क्षेत्रात 3 क्षेत्र सहाय्यक, वाळके सेवा वर्ग, गरमडे स्थाई पोस्टिंग,तर मने हे सुद्धा क्षेत्र सहाय्यक आहेत (अतिरिक्त दोन) तर नेरी क्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक रासेकर हे क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षक अशी दुहेरी भूमिका निभावत आहेत.

बराचसा शेतशिवार जंगलशेजारी असल्याने व या परिसरामध्ये वाघ, बिबट , अस्वल सारख्या इतर प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व जंगलातूनच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते त्यामुळे कोणतीही मानव वन्यजीव संघर्षाची स्थिती केव्हा ही निर्माण होऊ शकते. वनकर्मचार्यांना त्यावर लक्ष केंद्रित करावे लागत असते अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने  सर्वच “भार”  प्रभारीवर देत असल्याने  इतर कामे कसे करावे असा प्रश्र्न त्यांचे पुढे निर्माण होतो. तसेच कायम स्वरुपी जबाबदार अधिकारी नसल्याने बरेच काम अर्धवट पडून असतात  त्यामूळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते .याचा परिणाम  स्थानिक वनरक्षकांना नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागते.
मागील दोन वर्षापासून वनपरिक्षेत्रअधिकारी  कायम राहत नसल्याने आता पर्यंत  चार अधिकारी बदलून झाले असून  आलटून – पालटून     सिंदेवाही, नागभीड येथील  R.F.O. कडे  प्रभार देत असल्याने  व ते अधिकारी तिथूनच काम पाहत असल्याने   कर्मचाऱ्यांना च माहीत राहत  नाही आज कोण वनपरिक्षेत्र अधिकारी कोण असेल?
नागरिकांना जळाऊ लाकडे उपलब्ध करून देणे, खसरा धारकांना खसरा कापण्यासाठी परवानगी देने, वन्य प्राण्यांनी शेतातील शेत मालाचे नुकसान केले असल्यास त्यांचे पंचनामे करणे, जळाऊ लाकडांचा लिलाव करणे, जंगलातील लाकूड चोरीवर नियंत्रण ठेवणे,अतिक्रमणे अडवने, मानव वन्यजीव संघर्ष टाळने, असे अनेक प्रकारचे कामे या वनपरिक्षेत्र कार्यालया मार्फत  होत असतात. परंतु मागील काही महिन्यांपासून वन परिक्षेत्राधिकारी यांची जागा प्रभारींवर असल्यामुळे जनतेची ही कामे खोडम्बलेली आहेत. तरी मा. वनमंत्री साहेब यांनी या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष घालून पुर्णकाळ वनपरिक्षेत्राधिकारी व  वनरक्षक यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here