वनाधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी शंभराच्या वर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

0
140

भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यानंतर तणाव: जखमी ACF नागुलवार यांच्यावर उपचार

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) : भंडारा जिल्ह्यातील पवनी पासून,१५ कि.मी. अंतरावरील खातखेडा येथे २८ जून रोजी एका वाघाने ईश्वर सोमा मोटघरे या इसमानस हल्ला करून ठार केले. सदर घटनेनंतर घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या वनाधिकाऱ्यांवर संतप्त जमावाने हल्ला चढविला. यात वनपाल दिलीप वावरे आणि गुप्ता यांच्यासह सहायक वनरक्षक यशवंत नागुलवार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सुमारे १०० ते १५० ग्रामस्थांवर वनविभागाने गुन्हे दाखल केले आहेत. तथापि, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
सविस्तर वृत्त,वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार झाल्याचे कळताच तीन ते साडेतीन कि.मी. अंतरावरील गुडेगाव वनपरिक्षेत्रातून भंडाराचे सहायक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार, सावरलाचे क्षेत्रसहायक दिलीप वावरे, धानोरीचे वनपाल गुप्ता व अन्य वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र वाघाला पकडल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, प्रेत उचलू देणार नाही, अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांचा मार्ग रोखून धरला. यातून उद्भवलेल्या संघर्षा नंतर गावकऱ्यांनी शिवीगाळ करीत पथकावर हल्ला केला. त्यात तिन्ही अधिकारी गंभीर जख्मी झाले होते.
याप्रकरणी बीट रक्षक संगीता घुगे यांच्या तक्रारी वरून मुन्ना तिघरे (रेवनी), सीतकुरा काटेखाये, रवी थाटकर, राजकुमार काटेखाये, हिवराज मोटघरे (सर्व रा. खातखेडा) यांच्यासह अन्य १०० ते १५० नागरिकांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, ३५३, ३३२, ४०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाची चौकाशी सहायक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहे.

जमावाने पाठलाग करून केली मारहाण

जमावाचा रोष पाहून अधिकारी व कर्मचायांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र संतप्त जमावाने त्यांचा पाठलाग करून पकडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागुलवार जबर मारहाणीमुळे बेशुद्ध होऊन खाली पडले होते. वनपाल गुप्ता व वावरे सुद्धा जखमी झाले होते. नागुलवार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची चौकाशी कसून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here