आस्वलीच्या गुप्तांग व नखांसाठी करण्यात आली शिकार : 20 नखांसोबत 4 जणांना अटक

0
286

सिरोंचा : सिरोंचा वनविभागातील आडसा नियत क्षेत्रात जिवंत विद्युत तारांच्या साह्याने अस्वलीची शिकार केल्याची घटना 27 ऑक्टोबर 2022 रोजी उघडकीस आली.

सदर घटनेत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे नाव मधुकर मलय्या दुर्गम, महेंद्र चंद्रया कुम्मरी, राजबाबू पेंदासमय्या दुर्ग व समय्या मलय्या दुर्गम हे सर्व  राहणार लक्ष्मीपूर चे आहे व त्यांच्याकडून 20 अस्वलीचे नखे जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेण्यास सिरोंचा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. पाझारे यांच्या मार्गदर्शनात आरोपींना अटक करण्यात आले असून तपास दरम्यान अस्वलीचे चारही पायाचे पंजे व गुप्तांग कापून नेण्यात आले असल्याचे दिसून आले आहे  व घटना स्थळापासून काही अंतरावर मोहाच्या झाडाजवळ एका पिशवीत अस्वलीचे नखे लपवून ठेवण्यात आले असल्याची कबुली दिली. पुढील तपास सिरोंचा वनविभाग करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here