जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकाची नियुक्ती करतांना स्थानिकांना डावलून परजिल्हातील उमेदवारांची नियुक्ती..

0
197

स्थानिक उमेदवारांवर अन्याय ..

नियुक्ती रद्द करण्याची वन्यजीवप्रेमी रामू मादेशी यांची मागणी.

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्हा हा वनाने व्यापलेला आहे.या जिल्ह्यातील वनात मोठ्या प्रमाणावर विविध रोगांवर गुणकारी वनौषधी विपुल प्रमाणात आहेत.सोबतच विविध प्रकारचे वनोपज येथील वनात उपलब्ध आहे. येथील जाणकार स्थानिक वन्यप्रेमी लोकांना वनांची पुरेपूर माहिती असते.त्यामुळे वनविभागाने या जिल्ह्यात वनांचे संवर्धन व गावकऱ्यांत वनाविषयी जागृती करण्यासाठी व समन्वय राखण्यासाठी मानद वन्यजीव रक्षकाच्या पदाची निर्मिती केलेली आहे.ही नियुक्ती करतांना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य गरजेचे आहे.मात्र विशेष कार्य अधीकारी महसूल व वन विभाग यांनी 1 जून रोजी काढलेल्या शासन निर्णयात गडचिरोली जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षकाची निवड करतांना हेतुपुरस्सर गडचिरोली जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना डावलून चंद्रपूर येथील उदय पटेल यांची 3 वर्षांसाठीगडचिरोली जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात
आल्याने. जिल्ह्यातील स्थानिक पात्र उमेदवारांवर अन्याय झाला असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी रामु मादेशी यांनी केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्रफळ जास्त असल्याने याठिकाणी वन्यजीव रक्षक पद सुद्धा 2-3 किंवा त्यापेक्षा जास्त असले तरी वनविभागाला वनसंर्वधन करण्यात मदतच होईल, पण वनविभाग आपल्या विरोधात नं जाणारे वन्यजीव सदस्य निवडतात हे पुन्हा लक्षात आले, मागील सत्रातील वन्यजीव रक्षक पद हे ह्याच दोन सदस्यांना देण्यात आलं होत, आणि ह्या वर्षी सुद्धा त्याच सदस्यांची वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले, गडचिरोली जंगलातील समस्या पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत .अवैध वृक्षतोड वन्यजीवांच्या शिकारी,वनजमिनीवर अतिक्रमण ह्या तीन मुद्द्यावर कधीही मानद वन्यजीव रक्षकांनी मोठे पाऊल किंवा तक्रार केल्याचं कधिही दिसलं नाही,गडचिरोली चे मुख्य वन संरक्षक यटबोन असतांना जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी जनजागृती कार्यक्रम गावागावात जाऊन केले होते, मुख्य वनसंरक्षक यटबोन यांची बदली झाल्यावर हे पद अतिरिक्त प्रभार म्हणून चंद्रपूर चे मुख्य वन संरक्षक सांभाळत होते, त्यावर सुद्धा मानद वन्यजीव रक्षकांनी कधीही आवाज उठवल्याचे चित्र दिसलें नाही, मग अश्या मानद वन्यजीव रक्षकाचा काय उपयोग, कुठलीही पारदर्शकता टिकवून
ठेवण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देने गरजेचे आहे, म्हणून बाहेर जिल्ह्यातील सदस्यांचे पद रद्द करून स्थानिकांना मानद वन्यजीव रक्षक पद देण्यात यावे.

जमीन पातळीवर जो व्यक्ती कार्य करीत असते अश्या व्यक्तीला नियुक्ती न देता वनविभागाची हाजीहाजी करणाऱ्या व्यक्तीला वनविभाग नियुक्ती देते. वारंवार एकाच व्यक्ती ला नियुक्ती कशी दिली जाते?? ही बाब वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. वनविभागाने तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यातील उदय पटेल यांची नियुक्ती रद्द करावी व स्थानिक वन्यजीव सदस्यांची नेमणूक करावी व भविष्यात अश्या चुका होऊ नये याची खबरदारी घ्यावी.असा सल्ला वन्यजीव प्रेमी रामू मादेशी यांनी केली आहे

ह्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य वन्यजीव रक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) नागपूर, मुख्य वन संरक्षक गडचिरोली व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती वन्यजीव प्रेमी रामू मादेशी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here