घोडाझरी अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा

0
263

वन्यजीव सप्ताह निमित्ताने दि. 1 ऑक्टोबर रोजी घोडाझरी अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मवीर विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची नेचर ट्राक वर भ्रमंती करून मार्गदर्शन करण्यात आले.तसेच छत्तीसगड येथुन आलेल्या नॅशनल राॅली चे स्वागत करण्यात आले.व नंतर घोडाझरी रेस्टॉरंट येथे स्वागत समारंभ, मार्गदर्शन,व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वन्यजीव सप्ताह निमित्ताने मानद वन्यजीव संरक्षक विवेक भाऊ कळंबेकर निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे सदस्य क्षितीज गरमळे, अमोल वानखेडे अमित देशमुख, स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यशवंत कायरकर, सदस्य सर्पमित्र जिवेश सयाम यांनी मार्गदर्शन केले.
नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी के.अर. धोंडने व नागभीड वन परिक्षेत्राच्या वनरक्षक व क्षेत्र साहेबांनी नॅशनल रॅलीच्या स्वागत व आभार प्रदर्शनाचे काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here