
गोंदिया :
गोंदिया येथील कोहमारा मृधोली जंगल परिसरातूंन प्रवास करत असताना धावत्या दुचाकी वाहनावर अचानक वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली.
दिनांक 3 मई रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली यात
दुचाकी वाहन चालकाचे प्राण थोडक्यात वाचले .दुचाकी स्वार रंजीत परशुरामकर वय 35 व दानेश गहाणे वय 40 हे दोघेही खाडीपार येथील रहिवासी आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वाहन चालक एकीकडे पडले तर दुसरीकडे वाहनाचा प्रकाशामुळे वाघ झुडपात निघून गेला. त्याच वेळेस जवळील जात असलेल्या चारचाकी वाहन चालकांनी प्रत्यक्ष हा अनुभव घेतलेला आहे व त्यांनी दुचाकी वाहन चालकांना वाचविण्यास मदत ही केले.
