स्वाब नेचर केअर संस्था’ तर्फे तेंदुपत्ता संकलनाची परवानगी रद्द करण्यास निवेदन

0
210

विरळ झालेल्या जंगल परिसरातील तेंदुपत्ता वन्यप्राण्यांना देतो सुरक्षित आडोसा.
ब्रम्हपुरी वनविभागाच्या परिसरात वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी.
यावर्षी ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी च्या हद्दीतील संपूर्ण वनक्षेत्र हे वणव्याच्या आगीत मोठ्या प्रमाणात जळालेला आहे. व सोबतच घोडाझरी अभयारण्य हे तर जास्तच प्रमाणात जळालेले आहे . वणव्यात जळाल्या मुळे जंगलही विरळ झालेली आहे. सोबतच यावर्षी मानव व वन्यजीव संघर्ष्यातही वाढ झालेली आहे . मात्र वनव्या नंतर तेंदूची नव्याने येणाऱ्या पालवी मुळे जंगलात वन्यजीवांना थोडा आळोसा व संरक्षण प्राप्त होते . आणि सध्या आपल्या परिसरात दोन महिन्याच्या कालावधीत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात दोन इसम मृत्यू व एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे . त्यातही जर जंगलात तेंदूपत्ता संकलन सुरू झाले तर त्या करिता लोक मोठ्या प्रमाणात जंगलात प्रवेश करतील व पुन्हा मानव-वन्यजीव संघर्षाचा घडल्याचे घटना नाकारता येणार नाही . भविष्यातील अश्या गंभीर घटना टाळण्याकरिता तेंदुपत्ता संकलनाचे ची परवानगी रद्द करून तेंदूपत्ता संकलन आवर यावर्षी तात्पुरती बंदी घालण्यात यावी.
(येत्या चार-पाच वर्षातील आपल्या परिसरातील जंगलातील वनवण्याच्या घटनांची स्थिती पाहता ज्या-ज्या वर्षी व ज्या-ज्या परिसरात तेंदूपत्ता संकलनाची परवानगी देण्यात आली त्याच परिसरात व त्याच वर्षी वणव्याच्या लागण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडल्याचे निदर्शनास आलेले आहे. ज्या परिसरात परवानगी नव्हती तिथे सन २०१८ व २०२० ह्या वर्षी अस्या घटना न घडल्याचे उदा.आहेत. त्यामुळे तेंदुपत्ता संकलन करणारेच नव्याने पालवी यावी म्हणून वनवा लावण्याचे सरळ सरळ संबंध न करता येऊ शकत नाही.)
यामुळे जंगल जळालेल्या जंगल परिसरातील तेंदूपत्ता संकलनाचे ची परवानगी नाकारून तेंदुपत्ता संकलन वर बंदी घातली तर त्यांच्या भविष्यातील वनवण्याच्या घटना व मानव-वन्यजीव संघर्ष यावर मोठ्या का प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. या गंभीर विषयावर विचार करून निवेदनावर कारवाई करण्यात यावी.
करिता उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here