व्याघ्र सुरक्षा-संवर्धन समितीत रोहित कारू यांची निवड

0
131

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर): देशात वाघांची सुरक्षितता व संवर्धनासाठी तयार झालेल्या राष्ट्रीय पातळीवर टीम मध्ये उमरेड चे मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांची निवड करण्यात आली आहे. बाघोदय असे या कार्यक्रमाचे नाव आहे. नॅशनल टायगर प्रोजेक्टला ५० वर्षे पूर्ण झाले. सोबतच राजस्थान येथील सारिस्का येथे वाघांना विस्थापित करण्याच्या योजनेला १५ वर्ष पूर्ण झाली आहे या अनुषंगाने ४ ऑगस्ट 2023 ला बाघोदय या कार्यक्रमाचे आयोजन जयपूर येथे करण्यात आले असून हा कार्यक्रम वर्ल्ड वाइल्डरनेस कॉंग्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया व सारिस्का टायगर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या मध्ये डब्लूडब्लूटीआईचे वैश्विक अध्यक्ष वेंस जी मार्टिन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याला व्याघ्र राज्य बनविण्यात योगदान असणारे प्रवीण परदेशी, प्रतिष्ठित वन्यजीव फिल्म निर्माता सुबैया नल्ला मुथु, संगीतकार शंतनू मोईत्रा, डब्लूडब्लूएफ राष्ट्रीय महासचिव व सीईओ रवी सिंह, राजस्थानचे पूर्व वन व पर्यावरण मंत्री गजेंद्र सिंह खिवसर, एसटीफचे संस्थापक सचिव दिनेश दुराणी, वाईल्ड लाईफ मधील वरिष्ठ व प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब, इस्ट्रेल लिमिटेडचे कार्यकारी निर्देशक
कैरव इंजिनीअर, राष्ट्रीय पातळीवर ग्रीन ऑस्कर विजेता व नागपूर न जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू, ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हचे सीसीएफ व फिल्म निर्देशक डॉ.जितेंद्र रामगावकर, आय सी आय सी आय फाऊंडेशनचे सीईओ अनुज अग्रवाल, दौलत सिंह शक्तवत, आयसीआयसीआय बँकेचे बिजनेस प्रमुख सौरभ सिंह उपस्थ, डब्लूडब्लूटीआईचे चेअरमेन व एसटीएफचे अध्यक्ष सुनील मेहता उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघा वरील राष्ट्रीय गीत देशा समोर सादर केले, त्याचे राजस्थानी व्हर्जनचे सादर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here