उमरेड पवनी  कऱ्हांडला येथे वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने वन विभागात खळबळ

0
131

उमरेड पवनी  कऱ्हांडला  अभयारण्यातील उमरेड  (वन्यजीव) वनपरिक्षेत्रात कक्ष क्र.1418 क्षेत्रीय कर्मचारी दिनांक 03 जून 2023 रोजी सकाळच्या सुमारास पायदळ वस्ती करत असताना वनरक्षक सफर अली सय्यद यांना नाल्याजवळ वन्य प्राण्यांचा शवाचे उग्र वास येत आल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांना नाल्याजवळील  झुडपात वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले व माहिती मिळतात श्रीमती. ए. श्रीलक्ष्मी क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि प्रमोदकुमार पंचभाई विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य,नागपूर हे घटनास्थळी दाखल झाले. मृतक वाघाचे सर्व अव्यय साबूत होते व  NTCA च्या नियमानुसार वाघाच्या शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर नियमानुसार दहन करून नष्ट करण्यात आले.

यावेळेस श्रीमती. ए. श्रीलक्ष्मी क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि प्रमोदकुमार पंचभाई विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य नागपूर ,  मंगेश ठेंगडी सहायक वनसंरक्षक, सेलु घटक, अविनाश लोढे  मानत वन्यजीव रक्षक नागपूर तथा CLWL प्रतिनिधी, प्रफुल भांबूरकर NTCA प्रतिनिधी, डॉ. रोहिणी टेंभुर्णे पशुवैद्यकीय अधिकारी,  मंगेश ताटे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) तसेच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.

प्राप्त माहितीनुसार मृतक वाघाच्या अंगावरील सुळे घुसलेल्या खुणा आणि तुटलेल्या अवस्थेत खुब्याचे हाड दिसून आले असल्याने असे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की दोन वाघाचा झुंजीत एकाचा मृत्यू झाले असल्याचे वर्तवले जात आहे.
पुढील तपास श्रीमती. ए. श्रीलक्ष्मी क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि प्रमोदकुमार पंचभाई विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य नागपूर यांच्या मार्गदर्शनात मंगेश ठेंगडी सहायक वनसंरक्षक, सेलु घटक आणि मंगेश ताटे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here