सुनील लिमये राज्याचे नवीन वन्यजीव प्रमुख

0
545

सुनील लिमये (भा.व.से) हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य म्हणून नेमणूक करण्यात आले

सुनील लिमये, भा.व.से. (1988 बॅच), बीएससी (जिओलॉजी) एमएससी (वनीकरण), डिप्लोमा वन्यजीव व्यवस्थापन.

ते उपवनसंरक्षक वन्यजीव कोल्हापूर, सातारा, अलिबाग अतिरिक्त आदिवासी आयुक्त (अमरावती) संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.
मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) नागपूर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व व महाराष्ट्र पर्यावरण पर्यटन विकास मंडळ, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक.

पुन्हा अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई असे  विविध पदावर ह्या पूर्वी होते.

59 वर्षांचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट राज्य हे कोल्हापूर चे आहेत.

मुंबईतल्या आरे मिल्क कॉलनीत एका संशोधकाला कोळी (स्पायडर) ची नवी जात सापडली, त्यांनी सुनील लिमये यांनी आरे मिल्क कॉलनी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या मध्ये संवर्धन कार्य जे प्रभावी पणे जे लिमये यांनी केले या साठी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी जेरेझगो सनिलिमाये असे नवीन सापडलेल्या कोळी(स्पायडर) ला नाव दिले आहे, ही भारतातील जेरजेगो या जाती अंतर्गत फक्त दुसरी प्रजाती आहे.

लिमये यांच्या नावावर एक सरडे देखील आहे,
2018 मध्ये, एका संशोधकाने लिमॅय डे डे गेको (पाल) नावाचे एक निशाचर पालीचे नावा नाव ठेवले.

शासनाने नुकतीच त्यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ह्या राज्याच्या सर्वोच्च पदावर नेमणूक केल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत पर्यटनाचे प्रकल्प लवकर मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

लिमये ह्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेच्या कार्यात खूप मोठा हातभार लावला असून व्याघ्र प्रकल्पाचा व्यवस्थापन आराखडा ,पर्यटन आराखडा तसेच सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान स्थापणे मध्ये ही मोलाचे योगदान दिले आहे.

कोयनानगर, बामणोली,कांदाटी खोरे व चांदोली परिसरात पर्यटन वाढावे ह्यासाठी त्यांनी दुर्गम भागात रस्ते निर्माण करणे, वन्यजीवांची वाढ होण्यासाठी कुरण विकास इत्यादी महत्वपूर्ण कामे केली आहेत.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ह्या राज्याच्या सर्वोच्च पदावर नेमणूक झाल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे आराखडे लवकर मंजूर होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

भारतातील सर्वात मोठ बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संघ्रहालय नागपूर, गोरेवाडा येथे स्थापना करण्यात त्यांचा मोठा सहभाग असून कोयनानगर येथे त्याच धर्तीवर मोठे प्राणी संघ्रहालय , आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे सर्प उद्यान झाल्यास पर्यटकांची संख्या वाढवण्यात मदत होईल व त्या अनुषंगाने नवीन मोठी रोजगार निर्मिती होईल अशी अशा अधिकारी वर्गाला तसेच वन्यजीव प्रेमींना आहे. त्यांच्या तारुण्यात ते कुस्ती मधील राष्ट्रीय खेळाडू होते.

रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक सातारा

नाना खामकर 
हेमंत केंजळे

*आम्हा सर्वांतर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here