सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दोन बछड्याचा मृत्यु

0
310

यश कायरकर :

ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येत असलेल्या सिंदेवाही परिक्षेत्रातील उपक्षेत्र / नियतक्षेत्र सिंदेवाही मधील जाटलापूर गावाचे पांदन रस्त्यालगत बिबट्याचे दोन बछडे मृत्यू झाल्याची घटना दिनांक 04 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास निर्देशनास आले.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच वनाधिकारी क्षेत्रीय कर्मचारी, बंडू धोतरे, NTCA प्रतिनिधी तसेच विवेक कळंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रम्हपुरी हे तात्काळ घटनास्थळी उपस्थितीत झाले.
मृत बछड्याचे शवविच्छेदनासाठी डॉ. सुरपाम, पशुवैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती सिंदेवाही, डॉ. संतोष गवारे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही व डॉ. पराग खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी नवरगांव यांच्या उपस्थितीत झाले.
मृत बछड्याच्या शरीरावरील जखमा आसपास मिळालेला वाघाचा पाऊलखुणा वरून सदर बिबट्याच्या बछड्याचे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
शवविच्छेदनानंतर उपस्थित सर्व वनअधिकारी व कर्मचारी NTCA प्रतिनिधी व मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी यांच्या समक्ष बिबट्याचे बछड्याचे मृत शरीराचे दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here